गोवा खबर

माटोळी सजावट स्पर्धेचे निकाल जाहीर

Published

on

Spread the love

 गोवा खबर : गणेश चतुर्थी महोत्सवादरम्यान कला आणि संस्कृती संचालनालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय माटोळी स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. या वर्षी संपूर्ण गोव्यातून एकूण ९ कुटुंबांनी या स्पर्धेत भाग घेतला.

प्रथम पारितोषिक प्रियोळ, फोंडा येथील दत्ता नाईक यांनी पटकावले, दुसरे पारितोषिक सावईवेरे फोंडा येथील तृप्ती पालकर आणि कुटुंबीयांना देण्यात आले तर तिसरे पारितोषिक केळबाई, कुर्टी, फोंडा येथील विशांत वसंत गावडे यांना देण्यात आले. चौथे पारितोषिक बांदोडा, फोंडा येथील तानाजी गावडे आणि पाचवे पारितोषिक वायंगिणी, मये डिचोली येथील रंगनाथ जी. गावकर यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिकांचे विजेते पिळयें, धारबांदोडा येथील देवू शेटकर आणि बांबर, नानोडा सत्तरी येथील प्रज्योत म्हाळशेकर हे आहेत.

राज्यस्तरीय माटोळी स्पर्धेचे परीक्षण राजेंद्र केरकर, सूर्यकांत गावकर आणि दीपक चारी यांनी केले. माटोळी स्पर्धेतील विजेत्याना संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसे देण्यात येतील.

Trending

Exit mobile version