गोवा खबर

वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘एआय कॅमेरे’

Published

on

Spread the love

गोवा खबर : वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यभर ‘एआय कॅमेरे’ बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

आठ महिन्यांच्या आत हे कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी बसवले जातील. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांच्या हालचालींची नोंद होईल, वेगमर्यादा पाळली जात आहे का, नियमांचे उल्लंघन होत आहे का हे लगेच समजेल.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनावेळी गुदिन्हो म्हणाले, पर्यटकांची संख्या मोठी असल्याने वाहतुकीत शिस्त आवश्यक आहे. सर्वांनी जबाबदारीने वाहन चालवले, तर अपघात टाळता येतील.

Trending

Exit mobile version