गोवा खबर : सत्तरी तालुक्यातील लोकप्रिय पाली आणि चरावणे धबधब्यांच्या देखभालीसाठी तसेच सुविधा उभारण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय गोवा वनविकास महामंडळाने घेतला आहे.
महामंडळाच्या ११६व्या बैठकीत अध्यक्षा व आमदार डॉ. दिव्या राणे यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, गोव्याला पर्यावरणीय पर्यटनाचे आदर्श राज्य बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नैसर्गिक वारसा जपत शाश्वत पर्यटनाला चालना देणे हे आमचे ध्येय आहे.
विशेषतः पावसाळ्यात या धबधब्यांना मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. त्यामुळे तेथील सुविधांचा दर्जा उंचावून या स्थळांचा पर्यटनाच्या मुख्य प्रवाहात समावेश केला जाणार आहे.