गोवा खबर

जीएसटीत घट; विक्रीत वाढ व महसूलही वाढेल : दामू नाईक 

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय जीएसटी सुधारणा व स्लॅबात बदल यावर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी उत्साह व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत नाईक म्हणाले की, जीएसटी दर कमी केल्यामुळे ग्राहकांचा खर्च कमी होणार, मागणी वाढेल आणि परिणामी विक्रीही वाढून सरकारचा महसूलही वाढेल. विशेषत: औषधे, वैद्यकीय उपकरणे, ट्रॅक्टर्ससारखी कृषी उपकरणे व वस्त्रोद्योग यामध्ये ही बदल लोकांच्या पलीकडे थेट फायदेशीर ठरणार आहेत.

त्यांनी म्हटले की, आरोग्य विम्यावरील जीएसटी शून्यावर आणल्यामुळे सरकारने नागरिकांच्या आरोग्याबद्दलचे गांभीर्य दाखवले आहे. जीएसटी स्लॅबचे सुसूत्रीकरण व प्रक्रियेचे साधीकरण यामुळे ग्राहकांसाठी व उद्योगांसाठी खरी आणि दीर्घकालीन फायदेशीरता निर्माण होईल, असा त्यांचा दावा होता.

Trending

Exit mobile version