गोवा खबर

महाराष्ट्र आणि गोव्यातील ठराविक परीक्षा केंद्रांमध्ये 12 पासून एनआयओएस प्रात्यक्षिक परिक्षा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (एनआयओएस) एप्रिल-मे दरम्यान आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान असे वर्षातून दोनदा एनआयओएसच्या मुख्यालयाने निश्चित केलेल्या तारखांना सार्वजनिक परीक्षा घेते.

यावर्षी महाराष्ट्र आणि गोव्यातील ठराविक परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक 12.09.2025 रोजी एनआयओएस सार्वजनिक परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मधील माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत. पुणेस्थित एनआयओएसच्या क्षेत्रीय केंद्राच्या क्षेत्रीय संचालकांनी ही माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांना या प्रात्यक्षिक परीक्षांसाठीची प्रवेश पत्रे (हॉल तिकिट्स) एनआयओएसच्या https://sdmis.nios.ac.in या संकेतस्थळावर प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी उपलब्ध होतील. या संदर्भातील अद्ययावत माहितीसाठी एनआयओएसच्या सदर संकेतस्थळाला नियमितपणे भेट देण्याच्या सूचना संबंधित विद्यार्थी/पालक/ संरक्षक पालक यांना देण्यात आल्या आहेत.

Trending

Exit mobile version