गोवा खबर : राज्यपाल पी अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना आणि विशेषत: मुस्लिम बंधु, भगिनीना ईद-ई-मिलादच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, हा पवित्र दिवस म्हणजे महम्मद पैगंबराचा जन्मदिवस ज्यांचे जीवन करुणा, न्याय, नम्रता आणि दयेचे एक चिरंतन उदाहरण आहे. महम्मद पैगंबर यांचा जन्म पवित्र मक्का शहरात झाला. त्यांना इस्लामिक इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली व्यक्ती मानले जाते. त्यांनी लोकांना प्रामाणिकपणा, करुणा, न्याय आणि नम्रतेने जगायची शिकवण दिली.
राज्यपालांनी ईद-ए-मिलादच्या या आनंददायी प्रसंगी लोकांना महम्मद यांनी शिकविलेल्या शाश्वत मूल्यांशी पुर्नसमर्पित होण्याचे आवाहन केले. आपण केवळ प्रार्थना आणि धार्मिक विधींद्वारेच नव्हे तर आपल्या कृतींमध्ये दयाळूपणा, आपल्या व्यवहारात प्रामाणिकपणा आणि संपूर्ण मानवतेसाठी आपल्या हृदयात प्रेम याद्वारे आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्या शिकवणीचे आचरण करण्याचा प्रयत्न करूया. ईद मिलादचा सण आपण सर्वांना अधिक शांतता आणि आनंद घेऊन येवो असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.