गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ते एक उत्कृष्ट शिक्षक, एक महान तत्वज्ञानी आणि एक प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ होते. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान अमूल्य आहे आणि त्याचा परिणाम अतुलनीय आहे.

शिक्षकांनी समाजात दिलेल्या योगदानाप्रती आदर म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. राष्ट्र उभारणीत शिक्षकांची महत्त्वाची भूमिका सर्वमान्य आहे. ते तरुण मनांना समाजाचे आणि देशाचे आदर्श नागरिक बनण्यास मदत व मार्गदर्शन करतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि ज्ञानाची इच्छा जागृत करतात, त्यांच्या सर्जनशीलतेस प्रोत्साहन देतो.

या प्रसंगी, मी गोवा राज्यातील शिक्षक समुदायाला हार्दिक शुभेच्या देतो आणि मी मुख्यमंत्री-वशिष्ठ गुरु पुरस्कार २०२४-२५ च्या विजेत्यांचेही अभिनंदन करतो. आपल्या महान शिक्षण तज्ञाप्रमाणे तुम्ही आपल्या नेहमीच समर्पित सेवेव्दारे शिक्षण आणि मार्गदर्शन करत राहावे असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.

Trending

Exit mobile version