गोवा खबर : दक्षिण पश्चिम रेल्वेचा होस्पेट–वास्को दुपदरीकरण प्रकल्प सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
त्यांनी आरोप केला की, हा प्रकल्प पर्यटनासाठी नसून केवळ कोळसा वाहतुकीसाठी आहे. केंद्र सरकारने स्वतःच हे स्पष्ट केले असून, सरकारने लोकांचा विरोध दुर्लक्षित करून हा प्रकल्प पुढे नेला आहे.
आलेमाव म्हणाले की, या प्रकल्पामुळे गोवा प्रदूषणाचे केंद्र बनेल आणि दरवर्षी तब्बल ४३ मिलियन मेट्रिक टन कोळसा हाताळला जाईल. हे गोव्याच्या विनाशाचे लक्षण आहे, असे त्यांनी सांगून जनतेला कोळसा वाहतुकीविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.