गोवा खबर : रेव्होल्यूशनरी गोवन्स (RG) पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाच्या नावाखाली कोळसा व स्टील वाहतूक वाढवली जात आहे.
बोरकर म्हणाले की, हा प्रकल्प भगवान महावीर अभयारण्य आणि दाट रानातून जात असल्याने मोठा पर्यावरणीय धोका आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुद्धा याला विरोध केला होता, पण आता भाजप सरकारने भूमिका बदलली आहे.
त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, काँग्रेसमध्ये असताना विरोध करणारे काही आमदार भाजपात गेले आणि आता मात्र गप्प का आहेत?