गोवा खबर

काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भाजप गोव्याचे आंदोलन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी काँग्रेसने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भाजप गोव्याने तीव्र निषेध नोंदवला आहे. या निषेधासाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर आंदोलन आयोजित केले.

काँग्रेस नेत्यांकडून वारंवार नरेंद्र मोदी व त्यांच्या कुटुंबीयांविषयी केले जाणारे वैयक्तिक हल्ले ही त्यांच्या राजकीय हतबलतेची चिन्हे आहेत. मोदीजींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काँग्रेसचा मानसिक समतोल बिघडला आहे. सार्वजनिक जीवनातील सभ्यतेच्या सर्व सीमा काँग्रेसने ओलांडल्या आहेत, असा आरोप भाजप नेत्यांनी केला.

भाजपने काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाने तात्काळ, सार्वजनिक व बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली.

आंदोलनादरम्यान भाजपचे उपाध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर, कुंदा चोडणकर, दक्षिण गोवा जिल्हा परिषद अध्यक्षा अनीता थोरात, आमदार दाजी सालकर, प्रेमेंद्र शेट, केदार नाईक, डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी भाजपचे राज्य महासचिव सरवनंद भगत, माध्यम संयोजक सिद्धेश नाईक, भाजयुमो अध्यक्ष समीर मांद्रेकर, सुवर्णा तेंडुलकर, राज्य सचिव दीपक नाईक, रानिया कार्डोझो, धाकू मडकैकर, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष दयानंद कर्बोटकर, दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष प्रभाकर गावंकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Trending

Exit mobile version