गोवा खबर

जनरेटर व इन्व्हर्टरची नोंदणी बंधनकारक : वीजमंत्री ढवळीकर

Published

on

Spread the love

फोंडा : मोठ्या इन्व्हर्टर आणि जनरेटरमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी वीज खात्याने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

ज्यांच्याकडे मोठे इन्व्हर्टर किंवा जनरेटर आहेत त्यांनी त्वरित परवानगी घ्यावी, अन्यथा लवकरच कारवाई सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला.

ढवळीकर म्हणाले, चुकीच्या पद्धतीने वीज वापरणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येणार आहे. विजेचे मीटर अडगळीच्या ठिकाणी असलेल्यांनी ते नोव्हेंबर अखेरपर्यंत उघड्या जागेत हलवावे, अन्यथा दंडात्मक कारवाई होईल.

Trending

Exit mobile version