गोवा खबर

कोळसा वाहतूक होऊ देणार नाही : गोवा फॉरवर्ड

Published

on

Spread the love

गोवा खबर : कोळसा वाहतुकीमुळे गोव्याचे पर्यावरण धोक्यात येईल म्हणून कोणत्याही परिस्थितीत कोळसा वाहतूक होऊ देणार नाही, असा इशारा गोवा फॉरवर्ड पक्षाने दिला आहे.

पत्रकार परिषदेत पक्षाचे नेते विकास भगत म्हणाले, केंद्र सरकारनेच आता रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प कोळसा वाहतुकीसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकार नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भगत म्हणाले, गोव्यात पर्यटक निसर्ग अनुभवण्यासाठी येतात, कोळशामुळे होणारे प्रदूषण सहन करण्यासाठी नव्हे. या प्रकल्पाचा फटका मुरगांवसह चार मतदारसंघांना बसणार असल्याची नोंदही त्यांनी केली.

Trending

Exit mobile version