गोवा खबर

१२ दिवसांत विकले तब्बल ७५ हजार नारळ

Published

on

Spread the love

गोवा खबर : गणेश चतुर्थीच्या काळात नारळांच्या वाढत्या दरामुळे गोवा फलोत्पादन महामंडळाने अनुदानित दरात नारळ उपलब्ध करून दिले. या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, फक्त १२ दिवसांत तब्बल ७५ हजार नारळांची विक्री झाली आहे.

महामंडळाचे अध्यक्ष व आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले की, लोकांची मागणी लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला. पुढेही योजना सुरू ठेवायची की नाही याबाबत लवकरच महामंडळाची बैठक होणार आहे.

शेट यांनी स्पष्ट केले की, राज्यातील बहुतांश नारळ बाहेरून आयात केले जातात, त्यामुळे स्थानिक उत्पादन वाढवणे ही काळाची गरज आहे.

Trending

Exit mobile version