गोवा खबर

माटोळी विक्रेत्यांना ‘सोपो’ करातून सूट; खड्डे बुजवण्यासाठी दोन दिवसांची मुदत

Published

on

Spread the love

गोवा खबर : गणेशोत्सव काळात माटोळीचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांकडून ‘सोपो’ कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. यासंबंधीचे परिपत्रकही सरकारने जारी केले आहे.

चतुर्थीमध्ये माटोळी सजविण्यासाठी लागणारे फळे व वनस्पती विकणाऱ्यांना शुल्क न आकारण्याचे स्पष्ट निर्देश पालिका व पंचायतांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या वाढल्याने पुढील दोन दिवसांत ते बुजविण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. पर्वरीत उड्डाणपुलामुळे ओ कोकेरो ते मॉल दी गोवा हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय गणेशोत्सव काळात पुढे ढकलण्यात आला आहे.

याच वेळी मुख्यमंत्री सावंत यांनी पाकिस्तानी नागरिकत्व असलेले पण मूळ गोमंतकीय ब्रँडन वेलेंटिन क्रॅस्टो यांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र प्रदान केले. सीएएअंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे ते राज्यातील तिसरे नागरिक ठरले आहेत. क्रॅस्टो यांना तब्बल ४४ वर्षांनंतर हे नागरिकत्व प्राप्त झाले.

Trending

Exit mobile version