गोवा खबर

“इच्छा असेल तर मार्ग सापडतो” : दिगंबर कामत

Published

on

Spread the love
गोवा खबर:मडगाव पिंपळकट्टा येथील देव दामोदराचे दर्शन घेतल्यानंतर आमदार व मंत्री दिगंबर कामत म्हणाले, “काम करण्याची खरी इच्छा असेल तर मार्ग आपोआप सापडतो. मंत्रीपद असो वा नसो, लोकांचा विश्वास व कार्यकर्त्यांचा आधार हेच माझे बळ आहे.”
कामत म्हणाले, “साडेतेरा वर्षे आमदार म्हणून लोकांच्या सेवेत आहे. मंत्रीपद नसतानाही लोक आपल्या कामांसाठी माझ्याकडे येतात. माझ्या कार्यकर्त्यांना व मतदारांना वाटत होते की मला मंत्रीपद मिळाले तर विकासकामांना गती मिळेल. आज देवाच्या कृपेने ते शक्य झाले.”
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, गोवा प्रभारी बी.एल. संतोष, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला मंत्रिपद मिळाले. पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. याचा फायदा पक्षालाच होणार आहे कारण आमचे संबंध सर्वसामान्य लोकांशी घट्ट आहेत.”
या वेळी मडगाव न्यू मार्केट ट्रेडर्स संघटनेतर्फे कामत यांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी “गेल्या १४ वर्षांचा वनवास संपला आहे” अशा शब्दांत आनंद व्यक्त केला.
कामकाजाच्या वेळेवर आचारसंहिता कशी परिणाम करेल यावर विचारले असता कामत म्हणाले, “वेळेचे नियोजन कसे करावे हे मला चांगले माहीत आहे. याआधीही मोठे प्रश्न सोडवले आहेत. इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच,” असे ते म्हणाले.

Trending

Exit mobile version