गोवा खबर

गोवा – संस्कृतीचे प्रवेशद्वार या संकल्पनेवर आधारित बोधचिन्ह डिझाइन स्पर्धेचे गोवा टपाल विभागाकडून आयोजन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:भारतीय टपाल खात्याच्या, गोवा टपाल विभागाच्या वतीने गोवा पेक्स-2025 साठी, गोवा – संस्कृतीचे प्रवेशद्वार या संकल्पनेवर आधारित बोधचिन्ह डिझाइन करण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा गोव्यातील इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असेल.
भारतीय टपाल खात्याच्या, गोवा टपाल विभागाच्या वतीने, गोव्यात येत्या 28 आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी गोवा पेक्स 2025, या टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे.
या स्पर्धेत सादर केले जाणारे बोधचिन्ह A4 आकाराच्या कागदावर काढलेले असावे. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी टपाल खात्याच्या गोवा विभागाद्वारे नियुक्त परीक्षण मंडळ सर्वोत्तम बोधचिन्हाची निवड करेल. सर्वोत्तम बोधचिन्ह डिझाइन करणाऱ्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये रोख बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका फक्त स्पीड पोस्टद्वारे O/o the Sr. Supdt. Of Post Offices, Goa Division, Panaji 403 001 या पत्त्यावर पाठवाव्यात. लिफाफ्यावर GOA PEX 2025 LOGO असे ठळक अक्षरात लिहावे.
प्रवेशिकेच्या मागच्या बाजूस विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव आणि शाळेचा शिक्का तसेच विद्यार्थ्याचा संपूर्ण पत्ता असावा. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 08 सप्टेंबर 2025 असेल. जर सर्वोत्तम बोधचिन्ह म्हणून निवडलेल्या डिझाइनची गुणवत्ता समाधानकारक असेल, तर त्या डिझाईनची गोवा पेक्स 2025 साठी अधिकृत बोधचिन्ह म्हणून निवड केली जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
फोन क्र. – 9765509265 / 8208263377
ईमेल आयडी – dogoa.mh[at]gmail[dot]com/dogoa.mh@indiapost.gov.in

Trending

Exit mobile version