गोवा खबर

गोवा कोकणी अकादमीच्या योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा कोकणी अकादमीने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत आणि इच्छुक लेखक/प्रकाशकांकडून अर्ज मागवले आहेत. या योजनेसाठी इच्छुकांसाठी लेखी अर्ज सादर करण्याची अंतिम  मुदत २६/०८/२०२५ होती, ती आता १२/०९/२०२५ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.

योजना पुढीलप्रमाणे आहेत. पहिली चंवर योजना- (लेखकाच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनासाठी ७५% आर्थिक मदत), साहित्य प्रभा योजना- (पुस्तक प्रकाशनासाठी ७०% आर्थिक मदत), प्रतिभा सन्मान योजना- (प्रकाशन सहाय्य- प्रकाशकाकडून पुस्तके खरेदी- जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत पुस्तके), बालसाहित्य प्रकाशन – (पुस्तक प्रकाशनासाठी ७०% आर्थिक मदत), कोकणी नाटक – मांड योजना – (पुस्तक प्रकाशनासाठी ७५% आर्थिक मदत), लोकवेद पुस्तक प्रकाशन योजना – (लोकवेद पुस्तके प्रकाशित करण्यासाठी ७०% आर्थिक मदत) आणि शैक्षणिक साहित्य प्रकाशन योजना – (शैक्षणिक पुस्तके प्रकाशित करण्यासाठी ७०% आर्थिक मदत), लिप्यंतरित पुस्तकांचे प्रकाशन (६० % आर्थिक मदत), अनुवादित पुस्तक प्रकाशनास ७०% आर्थिक मदत, क्लॅरिसा वाझ  ई मोरेनास संशोधन शिष्यवृत्ती विशेष पुस्तक प्रकाशन योजना, संगीत साहित्य पुस्तक प्रकाशन योजना, दुर्मिळ साहित्य पुनर्प्रकाशन, लोकवेद पुस्तक प्रकाशन, अनुवादित पुस्तक प्रकाशन, लिप्यांतरित पुस्तक प्रकाशन, शैक्षणिक साहित्य प्रकाशन योजना आणि वैचिक पुस्तक प्रकाशन आणि बालसाहित्य प्रकाशन.

या योजनांसाठी इच्छुक संस्था/विद्यार्थ्यांकडून खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात आले आहेत: शैक्षणिक, बालसाहित्य, लोकसाहित्य, अनुवाद, संगीत या विषयांवर कार्यशाळा/शिबिरे आयोजित करण्यासाठी आर्थिक सहाय्य (५० जागांसाठी २५,००० रुपये आणि १०० जागांसाठी ४२,००० रुपये) लेखक विध्यार्थ्यांच्या भेटीला आणि विध्यार्थी लेखकांच्या भेटीला (शैक्षणिक  क्षेत्रातील संस्थांनी अर्ज करणे), कोकणी शैक्षणिक शिष्यवृत्ती – (बी.ए / एम.ए / पीएच.डी) स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, कोकणी संगीत कार्यक्रम निर्मिती- (संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेकडून अर्ज) लोकवेद संशोधनवृत्ती/ लोकवेद प्रकल्प- (कागदपत्रे आणि संशोधनासाठी आर्थिक सहाय्य).

या योजनेसाठीचे अर्ज अकादमीच्या कार्यालयात, गोवा संचार भवन, बीएसएनएल इमारत, ५वा मजला, पाटो, पणजी-गोवा येथे देखील उपलब्ध आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे अकादमीने जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी, कृपया अकादमीकडे पुढील क्रमांकावर संपर्क साधावा – ७७७५८९१८५७

Trending

Exit mobile version