गोवा खबर : 13 व 14 सप्टेंबर रोजी कला अकादमीत 19 वा पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव रंगणार आहे. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, कला व संस्कृती संचालनालय आणि कला अकादमी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यंदा 16 कलाकार या दोन दिवसीय महोत्सवात सादरीकरण करतील. उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
या वर्षीचा पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार प्रवीण गावकर यांना प्रदान केला जाणार आहे. हा कार्यक्रम सर्व संगीतप्रेमींसाठी खुला असून राज्यातील शास्त्रीय संगीत परंपरेला समर्पित आहे.