गोवा खबर

मडगावात ‘चवथीचो बाजार 2025’

Published

on

Spread the love

गोवा खबर : चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मडगाव भाजप मंडळ, भारतीय जनता युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चवथीचो बाजार 2025’ सुरू झाला.

आके येथील गुजराती समाज सभागृहात झालेल्या उद्घाटनप्रसंगी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी लोकांना बाजारात सहभागी होण्याचे आवाहन केले.

कामत म्हणाले, पूर्वी चतुर्थीची तयारी पंधरा दिवस आधीच सुरू व्हायची. आता मोबाईल व संगणकामुळे तशी उत्सुकता कमी झाली आहे. पण या बाजारातून स्वयंसहाय्य गटांना प्रोत्साहन मिळेल.

या प्रदर्शनात पर्यावरणपूरक आणि सेंद्रिय साहित्य विक्रीस ठेवले आहे.

Trending

Exit mobile version