गोवा खबर

गरजूंना घरे, आणखी 100 घरांचा संकल्प

Published

on

Spread the love

गोवा खबर : बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘श्रमधाम’ उपक्रमाअंतर्गत मंत्री रमेश तवडकर यांनी शनिवारी आणखी 30 घरे गरजूंना सुपूर्द केली. पणजी येथील कला अकादमीमध्ये झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री दुर्गादास अकाई यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या.

यापूर्वी या ट्रस्टमार्फत 40 घरे देण्यात आली असून पुढील चतुर्थीपर्यंत आणखी 100 घरे उभारण्याचा संकल्प तवडकर यांनी व्यक्त केला.

या सोहळ्याला आमदार दाजी साळकर, प्रेमेंद्र शेट, माजी आमदार दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर आदी उपस्थित होते.

भावनिक भाषणात तवडकर म्हणाले, पूर्वी आम्हालाही गरिबीचा अनुभव आहे. शेजाऱ्यांकडून साखर आणून पाहुण्याला चहा देत होतो. शेजारधर्म हीच खरी संस्कृती आहे. आजही मी आणि माझे घर या पलीकडे जाऊन समाजासाठी श्रमधाम योद्धे होऊ या.

Trending

Exit mobile version