गोवा खबर

२०२७ मध्ये पेडणेतूनच विधानसभा निवडणूक लढवणार : बाबू आजगावकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : पेडणेकरांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मी ठाम निर्णय घेतला आहे की २०२७ ची विधानसभा निवडणूक मी पुन्हा पेडणे मतदारसंघातूनच लढवणार. कोण काय म्हणाले तरी मला फरक पडणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले.

एका स्थानिक चॅनलवरील मुलाखतीत बोलताना आजगावकर म्हणाले, मी मंत्री असताना पेडणेचा सर्वांगीण विकास केला. अनेक प्रकल्प आणले. त्यामुळे जनता आजही माझ्या पाठीशी आहे. आमदार जीत आरोलकर यांनी पेडणेकरांची चिंता करण्यापेक्षा आपल्या मांद्रे मतदारसंघाचा विचार करावा.

आजगावकर म्हणाले, आरोलकर यांनी निवडणुकीपूर्वी जीवरक्षकांना कायम करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत त्याची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करून पुन्हा आश्वासने देण्यापेक्षा आधी जुनी आश्वासने पूर्ण करावीत.

त्यांनी पुढे म्हटले, आर्लेकर यांनी काय विकास केला हे जनता पाहत आहे. पेडणेकरांनी आमच्या कारकीर्दीत झालेला विकासही अनुभवला आहे. त्यामुळे मी २०२७ मध्ये पुन्हा निवडणूक लढवणार आहे.

Trending

Exit mobile version