गोवा खबर

न्यायालयाच्या आदेशानंतर भटक्या कुत्र्यांसाठी निवारा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्याबाबतचा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार लागू केला जाईल, असे पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

त्यांनी स्पष्ट केले, या संदर्भातील सर्व सुविधा न्यायालयाच्या निर्देशांनुसार उभारल्या जातील. सरकारकडे आवश्यक निधी उपलब्ध असून पंचायत व नगरपालिकांनी या प्रश्नावर पुढाकार घ्यावा.

मंत्री हळर्णकर म्हणाले, काही पंचायत व पालिका सक्रिय असल्या तरी सर्वच ठिकाणी काम होत नाही. प्रत्येक स्थानिक संस्थेने जबाबदारी घेऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करावी.

Trending

Exit mobile version