गोवा खबर

 मालीम जेटीचे काम एका वर्षात पूर्ण करणार : हळर्णकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजीतील मालीम जेटीच्या विस्तारीकरणासाठी सरकारने नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली असून एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

सोमवारी मंत्री हळर्णकर आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते मालीम येथे २० आसनी सार्वजनिक शौचालय ब्लॉक आणि ४० केएलडी क्षमतेच्या मलनि:स्सारण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

मंत्री खंवटे म्हणाले, या सुविधांमुळे मासेमार, स्थानिक नागरिक व पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल.

Trending

Exit mobile version