गोवा खबर

तुये येथे १२० कोटींचे रवींद्र भवन उभारणार

Published

on

Spread the love

गोवा खबर : पेडणे तालुक्यातील कलाकारांसाठी तुये येथे ५० हजार चौरस मीटर जागेत १२० कोटी रुपये खर्चून बहुउद्देशीय रवींद्र भवन उभारण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

या रवींद्र भवनमध्ये वातानुकूलीत सभागृह, ध्वनी प्रणाली, ८०० प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था, आर्ट गॅलरी, संगीत व नृत्य वर्ग, मिनी ऑडिटोरियम, कॉन्फरन्स रूम, कँटिन, वसतिगृह अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

आमदार आरोलकर म्हणाले, हा प्रकल्प तालुक्यातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे पूर्ण सहकार्य या प्रकल्पाला मिळत आहे.

Trending

Exit mobile version