गोवा खबर

दक्षिण गोव्याला मिर्झापूर बनू देणार नाही : पोलिस महासंचालक

Published

on

Spread the love

गोवा खबर : गेल्या आठवड्यात मुंगूल येथे झालेल्या गँगवॉरच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक आलोक कुमार आणि पोलिस महानिरीक्षक के.आर. चौरसिया यांनी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाला भेट दिली. या वेळी झालेल्या बैठकीत वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत दिले गेले.

डीजीपी कुमार म्हणाले, दक्षिण गोव्याला मिर्झापूर बनू देणार नाही. कोणत्याही गुन्हेगारी टोळ्यांना येथे वाढू दिले जाणार नाही. पोलिस किंवा सामान्य नागरिकांवर हल्ला सहन केला जाणार नाही.

या बैठकीला एसपी टिकम सिंह वर्मा यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी अलीकडच्या प्रकरणांत काही संशयितांना अटक केली असून तपास सुरू आहे.

Trending

Exit mobile version