गोवा खबर

मुरगाव बंदरातून कंटेनर शिपिंगचे पुनरुज्जीवन करण्याचे व्यापार परिषद २०२५चे उद्दिष्ट

Published

on

Spread the love

गोवा खबर : डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड आणि मुरगाव बंदर प्राधिकरण यांच्या वतीने तसेच गोवा औद्योगिक विकास महामंडळ (गोवा-आयडीसी) च्या सहकार्याने २१ ऑगस्ट २०२५ रोजी नोवोटेल- पणजी येथे व्यापार परिषदेचे (ट्रेड मीट २०२५) आयोजन करण्यात आले आहे. मुरगाव बंदरातून कंटेनर शिपिंगच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक म्हणजे हा उपक्रम असून या उपक्रमातून जागतिक व्यापारातील एक प्रमुख व्यापार केंद्र म्हणून आणि भारतातील लॉजिस्टिक क्षेत्रातील एक स्पर्धात्मक केंद्र म्हणून गोवा राज्याची ओळख बळकट करण्यावर या परिषदेत मुख्य भर राहणार आहे.

ट्रेड मीट २०२५च्या माध्यमातून गोवा राज्याच्या सागरी आणि व्यापार क्षेत्रातील नव्या व्यवसाय संधी शोधण्यासाठी कटिबद्ध असलेले उद्योग क्षेत्रातील नेते, बंदर प्राधिकरणाचे पदाधिकारी, लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यवसाय एका व्यासपीठावर येणार आहेत. गोव्यातील पुरवठा साखळी व्यवसाय क्षेत्रास बळकटी देण्यासाठी, विविध घटकांमध्ये धोरणात्मक भागीदारी वाढविणे आणि जागतिक बाजारपेठांशी जोडणी वाढवण्यासाठी उत्प्रेरक म्हणून हे व्यासपीठ महत्वाची भूमिका बजावणार आहे. नावीन्यता, कार्यक्षमता आणि विकास या बाबींवर लक्ष केंद्रित करून, या मेळाव्यातून भारताच्या कंटेनर शिपिंग नेटवर्कमध्ये मुरगाव बंदराला एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून स्थान देण्याचा उद्देश असून यामुळे सक्षम अशी जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक व्यापार परिसंस्था घडविण्यासाठी मार्ग खुला होणार आहे.

ट्रेड मीट २०२५ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून, गोवा राज्याचे परिवहन, उद्योग, पंचायत राज आणि शिष्टाचार मंत्री श्री. माविन गुदिन्हो; मुरगाव पत्तन न्यासचे चेअरमन डॉ. एन. विनोदकुमार, आयपीओएस; गोवा-आयडीसीचे चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स; डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन अहमद मोहिउद्दिन; गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक (आयएएस); आणि डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शमील अहमद यांची उपस्थिती राहणार आहे.

या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना, गोवा राज्याचे परिवहन, उद्योग, पंचायत राज आणि शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, मुरगाव बंदरातून कंटेनर शिपिंगचे पुनरुज्जीवन करण्याने राज्यातील व्यापार विकास तर होणार आहेच, त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक विकासाच्या नव्या संधीही उपलब्ध करणे, राज्यातील उद्योगांना सक्षम करणे आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारताचे प्रवेशद्वारे म्हणून गोवा राज्याचे स्थान ठळक करता येणार आहे. ही व्यापार परिषद गोव्यामध्ये मजबूत, अधिक कनेक्टेड आणि भविष्यातील गरजांसाठी आवश्यक लॉजिस्टिक्स इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.

डेल्टा पोर्ट्स मुरगाव टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन अहमद मोहिउद्दिन म्हणाले, कंटेनर शिपिंगसाठी मुरगाव बंदराचे धोरणात्मक केंद्र म्हणून पुनर्स्थापना करण्याची डेल्टा पोर्ट्स कटिबद्ध आहे. उद्योग क्षेत्रातील नेते, सरकारी संस्था आणि व्यापार भागीदारांना एकाच छताखाली एकत्र आणून, ही व्यापार परिषद परिवर्तनात्मक सहकार्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणार असून यातून पुरवठा साखळी क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवण्यास चालना देण्याबरोबरचे विकासाचे नवे मार्ग खुले करणार आहे. सागरी व्यापाराचे एक प्रमुख केंद्र म्हणून गोव्याचा विकास करण्याच्या या प्रवासात डेल्टा पोर्ट्सशी सहयोग करण्यासाठी आम्ही उद्योग भागधारकांचे हार्दिक स्वागत करतो.

२०२५ च्या व्यापार परिषदेत प्रमुख उद्योग आणि व्यापारी संघटना सहभागी होत असून, अर्थपूर्ण संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध भागधारक एकत्र येणार आहेत. वेर्णा औद्योगिक वसाहतीसह जी-आयडीसीच्या इतर औद्योगिक वसाहतींमधील उत्पादन प्रकल्प संस्था, मुरगाव पत्तन न्यास (एमपीए), भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), गोवा वाणिज्य महासंघ आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर (डब्ल्यूटीसी) यांचा प्रमुख सहभागींमध्ये समावेश आहे. तसेच कस्टम्स ब्रोकर्स असोसिएशन आणि फ्राइट फॉरवर्डसमधील आघाडीचे प्रतिनिधीही या परिषदेत सहभागी होत असून, मुरगाव बंदरातून कंटेनर शिपिंग पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जागतिक व्यापार नेटवर्कशी गोव्याचे संबंध मजबूत करण्यासाठी आवश्यक धोरणाची दिशा ठरवण्यासाठी तयार करण्यात या घटकांकडील असलेले विविधांगी व्यवसाय कौशल्य आणि दृष्टिकोन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ही व्यापार परिषद संमेलन २०२५ एक धोरणात्मक व्यासपीठ म्हणून काम करण्यास सज्ज आहे. या व्यासपीठावर विविध शासकीय विभागांचे प्रमुख, उत्पादन क्षेत्रातील नेतृत्व आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील व्यवसाय प्रतिनिधी धोरणात्मक सहयोगाच्या संधी शोधणार असून व्यावसायिक अनुभवांचे आदानप्रदान करत शिपिंग क्षेत्रातील भागीदारी बळकट करण्याबाबत मंथन करणार आहेत. व्यापार भागीदारीच्या प्रयत्नांना चालना देऊन, या क्षेत्रातील व्यावसायिक कार्यक्षमतेचा विकास करणे आणि मुरगाव बंदरातून कंटेनर शिपिंगच्या शाश्वत पुनरुज्जीवनासाठी एक सुसंगत कृतिआराखडा तयार करत जागतिक व्यापार क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक आणि प्रमुख केंद्र म्हणून गोवा राज्याचे स्थान मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Trending

Exit mobile version