गोवा खबर

जुने गोमंतकीय चित्रपट संवर्धित; खिडकी योजना लागू

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जुन्या चित्रपटांचे संवर्धन करण्याची घोषणा केली. १ सप्टेंबरपासून चित्रपट निर्मितीसाठी ‘एक खिडकी योजना’ लागू होणार आहे. या निर्णयामुळे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळवू शकतील, त्यामुळे प्रक्रिया जलद होईल आणि निर्मात्यांना मोठा दिलासा मिळेल.

गोवा राज्य चित्रपट महोत्सव २०२५ च्या समारोप सोहळ्यात वर्षा उसगावकर यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले, गोवा मुक्तीनंतरचे जुने चित्रपट संवर्धित करणे आवश्यक आहे. तसेच कोंकणी चित्रपट जास्तीत जास्त निर्मितीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वर्षा उसगावकर यांनी सरकारने चित्रपट निर्मितीसाठी किमान ४०–५० लाखांचे अनुदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या चित्रपट तयार करण्यासाठी जास्त खर्च येतो, त्यामुळे अनुदानामुळे निर्माते प्रोत्साहित होतील.

गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो म्हणाल्या, सिंगल विंडो प्रणाली’ कार्यान्वित होईल. यामुळे राज्यात चित्रपट, माहितीपट आणि जाहिरात चित्रणासाठी विविध परवानग्या एका ठिकाणी मिळतील, प्रक्रिया सोपी होईल आणि गोवाला ‘फिल्म फ्रेंडली स्टेट’ म्हणून अधिक बळ मिळेल.

Trending

Exit mobile version