गोवा खबर : गणेश चतुर्थीच्या स्वागतासाठी Viju Productions प्रस्तुत करत आहे हृदयस्पर्शी भक्तीमय संगीत व्हिडिओ “गणपती तू सर्वश्रेष्ठ”, जो १९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८:०० वाजता प्रदर्शित होणार आहे.
अनीकेत दादडिकर यांचा मधुर आवाज, नीलाई नाईक यांचे लेखन व संगीत, दिग्दर्शन रामप्रसाद अडपईकर, छायाचित्रण (DOP) सुमित राज, आणि निर्मिती आदेश कारवारकर यांनी केली आहे. या व्हिडिओत अनीकेत दादडिकर, विजयकुमार पांडुरंग कामत, तेजश्री व्ही.एन. खवंटे, संजीव प्रभू, रती भाटीकर, राधाकांत दिवकर, श्रिलेखा लिमये, वर्धन व्ही. कामत, रुचा वर्धन कामत, पूजा सिणई खंडेपारकर, कणक उल्हास चव्हाण, स्रिनिका सचिन नाईक, विवान कामत आणि आहान कामत यांची अप्रतिम भूमिका आहे.
श्री सिद्धिविनायक सार्वजनिक ट्रस्ट मंदिर, गोगळ हाऊसिंग बोर्ड, मडगाव, गोवा आणि त्याच दिवशी Neelai Naik – Official YouTube Channel वर जागतिक स्तरावर उपलब्ध होणार.