गोवा खबर

पर्यटनमंत्र्यांनी म्हापशात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे केले नेतृत्व

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा येथे ७९वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीने व उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मंत्री खंवटे यांच्या हस्ते तिरंगा फडकवून झाली. त्यानंतर मंत्र्यांनी गोवा पोलिस आणि एनसीसी कॅडेट्स तसेच बार्देझ तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या परेडचे निरीक्षण केले व सलामी स्वीकारली. स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवणारा एक उत्साही सांस्कृतिक कार्यक्रम झाला. माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर, जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी, मामलेदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या सोहळ्याचा एक भाग म्हणून, गोव्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राचे जतन आणि प्रचार करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल मच्छीमार, शेतकरी, कीर्तनकार, भजनी कलाकार, तियात्र कलाकार आणि खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला.

खंवटे यांनी देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. त्यांनी स्वावलंबी आणि सांस्कृतिकदृष्ट्या चैतन्यशील भारत निर्माण करण्यात गोव्याची भूमिका अधोरेखित केली. गोव्याच्या पर्यटन क्षमतेबद्दल बोलताना ते म्हणाले, आज गोवा राज्य केवळ विश्रांतीसाठीचे ठिकाण राहिलेले नसून, हे पुनरुत्पादित पर्यटनाचे स्थळ आहे, जिथे आपण आपल्या तरुणांसाठी रोजगार संधी निर्माण करताना आपला वारसा, संस्कृती आणि परंपरा जपत आहोत. अशा कार्यक्रमांमुळे आपल्याला आठवण होते, की स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्या समुदायाला सक्षम बनवण्यात, आपली ओळख जपण्यात आणि देशाच्या विकासात योगदान देण्यात आहे. जोडणी, नवोन्मेष आणि संधीच्या परिवर्तनीय क्षमतेद्वारे गोव्याला सक्षम बनवून, आम्ही गोमंतकीयांना दिलेली वचने पूर्ण करत आहोत. आत्मनिर्भर भारतचे स्वप्न साध्य करण्यासाठी, आम्ही डिजिटलायझेशन आणि कनेक्टिव्हिटीच्या शक्तीचा वापर करत आहोत, जेणेकरून एकही नागरिक मागे राहणार नाही, याची खात्री होईल. आमच्या माननीय पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत’च्या स्वप्नाशी सुसंगत राहून, आम्ही युवा शक्ती व महिला शक्तीद्वारे प्रत्येक महिला व तरुणाला नेतृत्व करण्यास सक्षम बनवीत आहोत. तसेच विकास हा समावेशक, प्रगतीशील आणि परिवर्तनकारी असेल, याची खात्री करत आहोत.

राज्य आणि देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी लोकांना प्रेरित आणि वचनबद्ध करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

Trending

Exit mobile version