गोवा खबर

साओ पेद्रो शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

Published

on

Spread the love

गोवा खबर : साओ पेद्रो येथील शासकीय प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिद्धेशनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्थानिक पंच विनोद देसाई, एस. एम. सी. अध्यक्षा शोभा खांदेपारकर, मुख्याध्यापिका मनीषा नाईक तसेच शाळेतील इतर शिक्षक व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश नाईक यांच्या हस्ते ड्रॉइंग किट्सचे वाटप करण्यात आले. देशभक्तिपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा संदेश दिला व कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.

Trending

Exit mobile version