गोवा खबर:पर्यटन मंत्री श्री रोहन खवंटे यांनी स्वातंत्र्य दिन हा एका दिवसाचा उत्सव नाही तर तो प्रत्येक दिवस स्वावलंबी होण्याबद्दल आहे असे सांगितले. स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हापसा येथे तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर ते बोलत होते.
गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे श्री. खवंटे म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्व सांगताना श्री. खवंटे यांनी स्वातंत्र्यामुळे आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रात प्रगती साधण्याची संधी मिळाली आहे असे त्यांनी सांगितले. “राष्ट्राच्या प्रगतीत लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे यावर त्यांनी भर दिला.
गोवा सरकारने त्यांच्या आधुनिक होमस्टे आणि ब्रेड अँड ब्रेकफास्ट धोरणाद्वारे पर्यटनाच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कसे काम केले आहे ते सांगितले. याव्दारे आम्ही महिला उद्योजकतेला सक्षम करू आणि हिंटरलॅंड पर्यटन विकसित करू असे मंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले गोवा सरकार पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेत आहे आणि तरुण, महिला, शेतकरी आणि गरीबांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. सरकारने गोव्याच्या भल्यासाठी काम केले. त्यांनी कोम्युनिदाद जमिनींवर बांधलेली अनधिकृत घरे नियमित करण्याच्या सरकारच्या अलिकडच्या निर्णयावर प्रकाश टाकला.
त्यांनी पर्यटन क्षेत्रातील कामगिरीची यादी देताना मंत्र्यांनी स्वदेशी दर्शन योजनेचा उल्लेख केला आणि सांगितले की या योजनेअंतर्गत उत्तर आणि दक्षिण गोव्यातील विविध स्थळांचा विकास होत असल्याचे सांगितले. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सरकार नेट कनेक्टिव्हिटी मजबूत करीत आहे आणि ऑनलाइन सेवांचे डिजिटायझेशन केल्याने सामान्य लोकांच्या जीवनात बदल झाला आहे असे त्यांनी सांगितले.
स्टार्ट-अप्सना भरभराटीसाठी सरकारने प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी उपस्थितांना लोकमान्य टिळक सारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे आणि स्वराज्याचे त्यांचे स्वप्न आणि सुभाषचंद्र बोस आणि इतरांच्या क्रांतिकारी उत्साहाचे स्मरण करण्याचे आवाहन केले आणि भारताच्या उभारणीसाठी या महान नेत्यांकडून प्रेरणा घेण्यास सांगितले.
यावेळी कृषी, क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रातील विविध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी श्री पुंडलिक खोर्जुवेंकर, उपजिल्हाधिकारी वर्षा परब व श्री पांडुरंग गाड, मामलेदार श्री अनंत मलिक, पीआय निखिल पालेकर, वरिष्ठ सरकारी अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक व इतर उपस्थित होते.