गोवा खबर:समाज कल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी आज केपे येथे आयोजित ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर बोलताना देशातील युवकांमध्ये राष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात सक्षम बनविण्याची प्रचंड क्षमता असल्याचे सांगितले.
श्री. फळदेसाई यांनी आपल्या भाषणात नशा मुक्त भारत मोहिमेवर भर दिला आणि लोकांना ड्रग्ज आणि इतर वाईट सवयींपासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यांनी देशात असलेली एकता आणि सौहार्द आणि विविध संस्कृती, धर्म आणि भाषा असूनही राष्ट्र आपल्याला कसे एकसंध आणि मजबूत ठेवते यावर भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात मेक इन इंडिया मोहीम राबविली जात असताना, भारताने प्रचंड वाढ पाहिली आहे ज्यामध्ये देशांतर्गत संरक्षण शस्त्रे आणि इतर पायाभूत सुविधांचे उत्पादन करण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली असे श्री. फळदेसाई यांनी सांगितले. पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू करणाऱ्या प्रधान मंच्यांच्या नेतृत्वाचे त्यांनी कौतुक केले.
श्री. फळदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सर्वसामान्यांच्या कल्याणासाठीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याच्या सरकारच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. याचा मोठ्या प्रमाणात आदिवासी समुदायांना फायदा होईल असेही त्यांनी सांगितले.
केपेचे उपजिल्हाधिकारी श्री. मनोहर कारेकर, नगरसेवक श्री. अमोल काणेकर, डीवायएसपी श्री. आशिष शिरोडकर, मामलेदार श्री. नेथन अल्फान्सो, पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन सांगोडकर, उत्पादन शुल्क निरीक्षक श्री. महेश्वर पै व इतर यावेळी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.