गोवा खबर

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानामुळे गोव्यात सांधेजोड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची अचूकता वाढली

Published

on

Spread the love
  • डॉ. अमेय वेलिंगकर यांनी पिक्सी वापरून केल्या ५० यशस्वी प्रक्रिया

गोवा खबर : रुग्णसेवेच्या प्रगतीसाठी समर्पित जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञानातील आघाडीच्या मेरिल यांनी भारतात सादर केलेल्या तर फ्रान्समध्ये विकसित झालेल्या पिक्सी या नाविन्यपूर्ण ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर) सर्जिकल प्लॅटफॉर्मचा वापर करून गोव्यातील प्रगत ऑर्थोपेडिक उपचारसुविधांमध्ये ५० यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा गाठत एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे.

गोव्यात प्रथमच, बोन अँड जॉइंट केअर येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अमेय वेलिंगकर आणि त्यांच्या टीमने या जटिल सांधेजोड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिक अचूक, कार्यक्षम आणि रुग्ण-अनुकूल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.

पिक्सी सिस्टीम हे एक प्रगत एआर-सहाय्यित उपकरण आहे जे सर्जनच्या स्क्रीनवर रिअल-टाइम ३डी शारीरिक दृश्ये प्रक्षेपित करून शस्त्रक्रियेदरम्यान अचूक संरेखन सुनिश्चित करते. ही क्षमता प्लेसमेंट आणि संरेखनात अतुलनीय अचूकता प्रदान करते, ज्यामुळे मानवी त्रुटींचे प्रमाण कमी होते. गुंतागुंतीचे मोजमाप सोपे करून, पिक्सी कमी वेळेत शस्त्रक्रिया करते, शस्त्रक्रियेदरम्यानची गुंतागुंत कमी करते आणि रुग्ण लवकर बरा होण्याबरोबरच दीर्घकालीन सकारात्मक परिणामांची खात्री वाढवते.

या कामगिरीबद्दल बोलताना, डॉ. अमेय वेलिंगकर म्हणाले “आमच्या शस्त्रक्रिया प्रॅक्टिसमध्ये पिक्सी एआर तंत्रज्ञानाचा समावेश करणे हे एक गेम-चेंजर ठरले आहे. यामुळे आम्हाला रुग्णाच्या शरीररचनाचे वास्तविक वेळेत दृश्यमान करणे, अति-अचूक छेद घेणे आणि प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करणे शक्य होते. याचा अर्थ कमी रक्तस्त्राव, रुग्ण बरा होण्याची गती जास्त आणि रुग्णांसाठी चांगले दीर्घकालीन परिणाम साधले जातात. ५० यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा ही फक्त सुरुवात आहे. शस्त्रक्रिया प्रक्रियेचा कायापालट करण्याविषयी एआर तंत्रज्ञानामध्ये प्रचंड क्षमता दडली आहे.”

शस्त्रक्रियेतील ऑगमेंटेड रिअॅलिटीचे फायदे ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंटच्या पलीकडे जातात. त्याची क्षमता अनेक वैद्यकीय वैशिष्ट्यांमध्ये आहे. न्यूरोसर्जरीमध्ये नाजूक मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी अधिक दृष्यमानता प्रदान करते. ऑन्कॉलॉजीमध्ये ट्युमरचे अचूक स्थळनिदान करत तो काढून टाकणे सुलभ बनवते. कार्डिओलॉजीमध्ये, कॅथेटर अचूकतेने योग्य स्थानी पोचवणे एआरमुळे सुलभ बनते. तसेच विविध प्रकारच्या किमान छेद घेऊन करावयाच्या शस्त्रक्रियांसाठी अधिक सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रभावी उपचारसेवा देणे शक्य होते.

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आरोग्यसेवेत मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी सज्ज असून, यामुळे जगभरातील रुग्ण, शल्यविशारद आणि आरोग्यसेवा प्रणालींना अतुलनीय लाभ मिळणार आहे. एआरच्या विशाल क्षमतांचा शोध घेणे व त्यांचा विकास करणे आणि त्याद्वारे सुरक्षित, कार्यक्षम आणि सर्वांसाठी सुलभ उपचारसेवा उपलब्ध होतील असे भविष्य घडविण्यासाठी बोन अँड जॉइंट केअर कटिबद्ध आहे.

Trending

Exit mobile version