गोवा खबर : गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी मंगळवारी विविध गावातील भजनी मंडळे, महिला बचतगट, युवक मंडळे आणि विद्यार्थ्यांना संगीत साहित्याचे वाटप केले.
या वाटपात घुमट, पेटी, तबला, टाळ, पखवाज, समई यांसारखी भजन आणि कीर्तनासाठी लागणारी साहित्ये देण्यात आली. केरी पंचायतक्षेत्रातील रावण गावातील श्री सिद्धेश्वर भजनी मंडळ, भुईपाल येथील सरकारी हायस्कूल, म्हावशी येथील श्री सातेरी स्वयंसहाय्य गट, नारायणनगर-होंडा येथील पिंक मेजीक सेल्फ हेल्प ग्रुप, तसेच झर्मे-म्हावशी येथील प्रथमेश घुमटी आरती ग्रुप यांना हे साहित्य देण्यात आले.
यावेळी आमदार राणे म्हणाल्या, गोव्याची खरी ओळख ही आपल्या सण-उत्सवांतून दिसून येते. ही परंपरा आणि संस्कृती टिकून राहावी, यासाठी कलाकार आणि मंडळांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.