गोवा खबर

गोवा-लंडन गॅटविक विमानसेवा त्वरित पूर्ववत करण्याची मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : एअर इंडियाने गोवा-लंडन गॅटविक थेट विमानसेवा बंद केल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय होत असल्याची चिंता राज्यसभेत व्यक्त करण्यात आली. गोव्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा मांडत सेवा त्वरित पूर्ववत करण्याची मागणी केली.

तानावडे म्हणाले, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन गॅटविकसाठी एअर इंडियाची थेट नॉन-स्टॉप सेवा २१ जुलै २०२३ रोजी सुरू झाली होती. आठवड्यातून तीन दिवस चालणाऱ्या या सेवेचा गोमंतकीय आणि परदेशी पर्यटक दोघांनाही मोठा फायदा होत होता. गोवा आणि लंडन यांच्यातील नाते केवळ पर्यटनापुरते मर्यादित नसून सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये जोडलेले आहे.

ही सेवा बंद झाल्याने परदेशात राहणारे गोमंतकीय, तसेच व्यावसायिक प्रवास करणारे आणि पर्यटन क्षेत्रातील लोकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व एअर इंडियाने तातडीने ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Trending

Exit mobile version