गोवा खबर

भाषावाद नको संवाद साधूया : डॉक्टर पूर्णानंद च्यारी 

Published

on

Spread the love

गोवा खबर : भाषा वाद नको संवाद हवा. भाषेच्या माध्यमातून आम्ही एकत्रित येऊन आपापल्या गावातील बोलीभाषा अजरामर करूया. या मातीने आम्हाला कुळागर दिली, शेती दिली. आणि भास दिलेली आहे. जर एक शेत नष्ट झाले. तर कोकणी भाषेतील शब्द किती नष्ट होतील. याची जाणीव करणे. कठीण असल्याचे प्रतिपादन गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर पूर्णानंद च्यारी यांनी मोरर्जी श्री कळसदेव मांगर सभागृहामध्ये कोकणी सेवा केंद्र पेडणे केंद्राचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर बालभवन केंद्राचे अधिकारी शशिकांत पुनाजी, कोकणी सेवा केंद्राच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संजना शेटगावकर, शिक्षिका अपर्णा गारुडी, सचिव रत्नेश शिरोडकर मोरर्जी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश शेटगावकर मोरजी सार्वजनिक कला क्रीडा संघाचे अध्यक्ष प्रसन्न कुमार शेटगावकर, संतोष महाले, अद्वैत साळगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी कोंकणी सेवा केंद्र पेडणे गोंय वेवस्थापन समिती अध्यक्ष : संजना शेटगांवकार, विकास आजगांवकार सचीव, रत्नेश शिरोडकार, जोड सचीव, सायली आजगांवकार भांडारी, सागर शेटगांवकार जोड भांडारी, श्वेता कोनाडकार  सल्लागार : संतोष महाले, अव्दैत साळगांवकार, आमंत्रीत सल्लागार : अपर्णा गारूडीआदींना पुष्प देऊन स्वागत केले.

संस्कृती महाले व भूमी शेटगारकर यांनी मान्यवरांचा परिचय केला. सूत्रसंचालन पेडणीच्या बोली भाषेमध्ये विकास आजगावकर यांनी केले.

अपर्णा गारुडी यांनी यावेळी प्रास्ताविक केले. तर संजना शेटगावकर यांनी स्वागत आणि आपले मनोगत व्यक्त करताना कोकणी सेवा केंद्रामार्फत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील. असे त्यांनी सांगितले.

महिलांनी आपापल्या द्यालो लोकगीता मधून कोकणीची सांस्कृतिकाय जिवंत ठेवली असल्याचे चारी म्हणाले .

अद्वैत साळगावकर यांनी पेडणेच्या बोली भाषेमध्ये पेडणे तालुक्यातील सर्व देवतेंचा उल्लेख करत सामुदायिकपणे गाराने घालून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

बाल भवन केंद्राचे अधिकारी शशिकांत पुनाजी यांनी पेडणेकर भाषेमधील वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग करत, या कार्यक्रमात एक वेगळीच उंची आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कोकणी सेवा केंद्रा मधून आज ज्या पद्धतीने फुगडी धालो सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यातील वेगवेगळ्या गावातील वेगवेगळे शब्द त्यामध्ये येतात. त्या बोली भाषेचा विकास होईल. त्याचवेळी कोकणीचा विकास होणार आहे. पेडणीची भाषा तेवढीच महत्त्वाची तशीच इतर गावातीलही बोलीभाषा महत्त्वाची ठरत आहे. प्रत्येकाने आपापली बोलीभाषा राखून ठेवूया असे आवाहन केले.

यावेळी वेगवेगळ्या मोरजीतील महिला मंडळांनी धालो आणि फुगडी लोककला सादर केली. या महिला ग्रुपच्या प्रमुखांचे गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर पूर्णानंद च्यारी आणि शशिकांत पुनाजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अपर्णा गारुडी संजना शेटगावकर व अद्वैत साळगावकर यात कोकणी भाषेसाठी महत्त्वाचे दिलेले योगदान लक्षात घेत या तिघांचाही जाहीर सत्कार करण्यात आला.

Trending

Exit mobile version