गोवा खबर

माहिती खात्यात श्री सत्यनारायण महापूजा संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर :माहिती व प्रसिद्धी खात्याची श्री सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहाने खात्याच्या आवारात संपन्न झाली. पूजेची सुरुवात धार्मिक विधी, त्यानंतर तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाने झाली. खात्यांतील कर्मचारी   श्री. सर्वेश फडके आणि त्यांच्या पत्नी श्रीमती साधना सर्वेश फडके पूजेचे यजमान होते. यावेळी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला. वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी केली जाते.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुखांमध्ये मुख्य माहिती आयुक्त श्री अरविंद नायर, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्री गौरीश कळंगुटकर, पत्रकार, खाते प्रमुख, सरकारी कर्मचारी आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री. दीपक बांदेकर आणि इतर अधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

Trending

Exit mobile version