गोवा खबर:प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी २ ऑगस्ट २०२५ रोजी वाराणसी येथे सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होणाऱ्या कार्यक्रमात पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता जमा करतील.
हा दिवस ‘प्रधानमंत्री किसान दिवस’ म्हणून पाळण्यात येईल आणि या वरील लिंकद्वारे शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक प्रमुख योजना असून फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्र्यानी सुरू केली होती. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या आधार-लिंक्ड आणि डीबीटी बँक खात्यांमध्ये दरवर्षी थेट ६,०००/- रुपयांची आर्थिक मदत या योजनेखाली जमा करण्यात येते. आतापर्यंत, १९ व्या हप्त्यांद्वारे ३.६९ लाख कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.