गोवा खबर

तीन वर्षांत ‘जंकेट’ दौऱ्यांवर सरकारचा ६० कोटींचा खर्च : आमदार विजय सरदेसाई यांची टीका

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्यटन खात्याच्या खर्चावर चर्चा करताना आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत मंत्र्यांच्या देश-विदेशातील दौऱ्यांवर एकूण ६० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

सरदेसाई म्हणाले, होमस्टे योजना फसलेली आहे. २०२३-२४ मध्ये २.५ कोटींची तरतूद असून केवळ १.२ लाख रुपये खर्च झाले. समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी १२ कोटींची तरतूद असून केवळ ५५% निधी खर्च झाला. त्यांनी स्थानिक बचत गटांनाच कंत्राटे द्यावीत अशी मागणी केली.

डिजिटल संग्रहालयासाठी तरतूद असलेल्या ८० कोटींपैकी फक्त ८३ लाख रुपये खर्च झाले आहेत. पर्यटन खात्याचे दोन स्वतंत्र विभाग – गोवा पर्यटन आणि पर्वरी पर्यटन – करण्याची सूचनाही त्यांनी केली.

Trending

Exit mobile version