गोवा खबर : दयानंद योजनेखाली दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक मानधन वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.
सध्या ८०% पेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना ₹३,५०० आणि ४०% ते ८०% अपंगत्व असलेल्यांना ₹२,००० मासिक मानधन दिले जाते.
सरकारने नुकतेच पंतप्रधान दिव्यांशू केंद्र स्थापन केले असून, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी समकक्ष प्रमाणपत्र मिळवण्याची सोयही करण्यात आली आहे.