गोवा खबर

दिव्यांगांसाठी आत्मसन्मानाचे पाऊल

Published

on

Spread the love
  • होंड्यात दोन दिव्यांगांना ट्रायसायकल्स वाटप; आमदार डॉ. दिव्या राणे यांचा पुढाकार

गोवा खबर : दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून, त्या अनुषंगाने चोडणकरनगर भुईपाल येथील लक्ष्मण घाडी आणि शेखर छलवादे यांना मोटराइज्ड ट्रायसायकल्स वितरित करण्यात आल्या.

या कार्यक्रमात आमदार डॉ. दिव्या राणे, अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या संचालक वर्षा नाईक, उपसंचालक डॉ. मेरिसेल्डा मॉन्टेरियो, उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुट्टीकर, जि.प. सदस्य सगुण वाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

“हा कार्यक्रम माझ्या मनाशी जोडलेला आहे, असे सांगत आमदार राणे यांनी दिव्यांग योजनांचा लाभ घराघरात पोहोचवण्याचे आश्वासन दिले. वाळपईतील शिबिरानंतर आता खाणप्रभावित भागातील दिव्यांगांसाठी खास ट्रायसायकल्स वितरित करण्यात आल्या.

लाभार्थी लक्ष्मण घाडी यांनी वाहन मिळाल्याने आपले जगणे अधिक सुलभ होईल, अशी भावना व्यक्त केली.

Trending

Exit mobile version