गोवा खबर

क्रीडा क्षेत्राला बळ देण्यासाठी आर्थिक हातभार

Published

on

Spread the love
  • मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून संघटनांना आर्थिक सहाय्य, ऑलिम्पिक 2036 च्या तयारीवर भर

गोवा खबर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर गोव्यात क्रीडा क्षेत्रात मोठी ऊर्जा आणि सकारात्मक वातावरण तयार झाले असून, खेळाडू, क्लब आणि क्रीडा संघटनांची यात महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

राज्यातील २२ क्लब्सना एकूण २७ लाख ८४ हजारांची आणि विविध क्रीडा संघटनांना मिळून २ कोटी १४ लाख १३ हजार ९५० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. ऑगस्टमध्ये क्रीडा बजेट मंजूर झाल्यावर उर्वरित ५० टक्के रक्कम वितरित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला आमदार संकल्प आमोणकर, क्रीडा संचालक डॉ. गीता नागवेकर, गोवा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी ऑलिम्पिक 2036 साठी गोव्यानेही तयारी सुरू करावी, असे आवाहन करताना केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ मोहिमेचा भाग बनण्याचा संदेश दिला. तर गुरुदत्त भक्ता यांनी खेळाडूंना मिळणारा ३०० रुपयांचा भत्ता अपुरा असून, आर्थिक मदतीशिवाय क्रीडा क्षेत्र बहरणार नाही, असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सर्व क्रीडा क्लब व संघटनांना वापरात नसलेली मैदाने ताब्यात घेऊन त्यावर सराव सुरु करण्याचे आवाहन केले. मात्र आवश्यकता भासल्यास ती मैदाने सरकारला परत करावी, अशी अट त्यांनी नमूद केली.

Trending

Exit mobile version