-
विजय सरदेसाई आणि वीरेश बोरकर अनुपस्थित; विरोधकांमधील फूट पुन्हा उघड
गोवा खबर : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि आर. जी.चे आमदार वीरेश बोरकर अनुपस्थित राहिल्याने विरोधी गोटातील फूट पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत काँग्रेसचे आमदार कार्ल्स फेरेरा व एल्टन डिकोस्ता, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस व क्रूझ सिल्वा उपस्थित होते.
युरी आलेमांव म्हणाले, जनता आमच्याकडे पाहत आहे. त्यामुळे वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. त्यांनी सरकारच्या एका मोठ्या घोटाळ्यापासून वाचण्यासाठी ‘हरित करा’चा प्रश्न अतारांकित केल्याचा आरोप केला.
आमदार व्हिएगस यांनी विधानसभेत जनतेचे मुद्दे मांडून सरकारला जाब विचारण्याचा निर्धार व्यक्त केला. तर आमदार फेरेरा यांनी अधिवेशनापूर्वी आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.