गोवा खबर

‘मान्सून एक्सप्रेशन’मध्ये सहभागी होण्याचे कलाकारांना आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर : कला आणि संस्कृती संचालनालयाने १९ ते २१ जुलैपर्यंत पणजीतील पाटो येथील संस्कृती भवनातील कला दालनात मान्सून एक्सप्रेशन‘ या विषयावर गोव्यातील कलाकारांच्या चित्रांचे एक विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.

प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या कलाकारांना १७ जुलैपूर्वी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पणजीतील संस्कृती भवनात २x५ फूट लांबीचे एक कलाकृती, चित्र सादर करावे लागेल.

अर्ज कला आणि संस्कृती संचालनालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ०८३२-२४०४६३०/२४०४६०६/६०० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Trending

Exit mobile version