गोवा खबर : समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी १५८३ मध्ये झालेल्या ऐतिहासिक कुंकळी बंडात कुंकळीच्या १६ महानायकांनी पत्करलेले हौतात्म्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून ते जपले पाहिजे आणि प्रत्येक तरुणाला राष्ट्राच्या प्रगती आणि विकासासाठी योगदान देण्यासाठी प्रवृत्त करील असे सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने कुंकळी येथील नायक हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित बंडांच्या महानायकांच्या आदरांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते.
मंत्री फळदेसाई यांनी कुंकळीच्या नायकांनी वसाहतवादी राजवटीने केलेल्या अत्याचारांविरुद्ध लढा दिला आणि हौतात्म्य पत्करले. या ऐतिहासिक बंडाचे महत्त्व असून या बंडाच्या इतिहासाचा समावेश सरकारच्या नियोजित गोवा मुक्ती चळवळीच्या इतिहासावरून अॅनिमेशन चित्रपटात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
फाळदेसाई यांनी गोव्यातील इतिहास आणि कागदपत्रांचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याकडून डिजिटलायझेशन केले जात आहे. असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कुंकळी बंड हे वसाहतवादी राजवटीविरुद्ध आशियातील पहिले बंड म्हणून ओळखले जाते. १८५७ मध्ये ब्रिटीश राजवटीविरुद्ध भारताने पहिला बंड पाहिला परंतु कुंकळीच्या नायकांनी २७४ वर्षांपूर्वी आक्रमकांविरुद्ध बंड केले असे सांगितले.