गोवा खबर

राज्याला दक्षिण आशियातील एआय हब म्हणून स्थान देण्यासाठी डीआयटीई अँड सीकडून गोवा एआय मिशन २०२७चे अनावरण

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याने (डीआयटीई अँड सी) महत्त्वाकांक्षी व भविष्यासाठी सज्ज असलेल्या राज्याच्या दृष्टीकोनाचा एक भाग म्हणून ‘गोवा एआय मिशन २०२७’चा आराखडा जाहीर केला आहे. हा दक्षिण आशियातील एआय डेस्टिनेशन म्हणून गोव्याला स्थान देण्याच्या उद्देशाने राबविलेला एक धोरणात्मक, राज्यव्यापी उपक्रम आहे. पणजीतील ताज विवांता येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात गोव्याच्या जबाबदार, समावेशक आणि नवोन्मेष-चालित एआय परिसंस्था तयार करण्याच्या वचनबद्धतेचे वर्णन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आयटीई अँड सी मंत्री रोहन खंवटे, डीआयटीई अँड सी संचालक कबीर शिरगावकर आणि औद्योगिक नेते, स्टार्टअप संस्थापक, शिक्षणतज्ज्ञ आणि नागरी प्रतिनिधी उपस्थित होते.

गोवा हे केवळ पर्यटन स्थळ नसून स्टार्टअप्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये खरी प्रगती होत असलेले राज्य आहे, हे आम्हाला लोकांना दाखवून द्यायचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. “गोवा एआय मिशन २०२७चा एक भाग म्हणून, आम्ही एआय सल्लागार परिषद स्थापन करू. तसेच उद्योग व शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने शालेय स्तरावर एआय शिक्षण एकत्रित करण्याचे काम आम्ही सुरू करणार आहोत. हे मिशन राष्ट्रीय इंडियाएआय ध्येयाशी सुसंगत आहे आणि स्थानिक प्रासंगिकता, प्रवेश व संधी सुनिश्चित करून विद्यार्थ्यांना व आपल्या राज्याला ते भविष्यासाठी तयार करते.

ही मोहीम प्रशासन, सार्वजनिक सेवा, कौशल्य आणि इतर गोष्टींवर मोजता येण्याजोगा प्रभाव असलेली, एक समग्र एआय परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न करते. २०२७ पर्यंत, ही गोव्याच्या वार्षिक जीडीपीमध्ये लक्षणीय योगदान देईल तसेच डिजिटल व आर्थिक विकासाला देखील दीर्घकाळासाठी चालना देईल, अशी अपेक्षा आहे.

गोवा राज्य हे नैतिक आणि जबाबदार एआय स्वीकारण्यात नेतृत्व करण्यास तयार आहे, यावर मंत्री रोहन खंवटे यांनी भर दिला. गोवा एआय मिशन २०२७सोबत, आम्ही सुरुवातीपासूनच धोरण, पायाभूत सुविधा, संशोधन आणि कौशल्य विकासाची उभारणी करत आहोत. गोव्यातील महाविद्यालयीन पदवीधरांसाठी १००% रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही शैक्षणिक क्षेत्र व उद्योग यांचे संरेखन करत आहोत. या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी एआय आहे.

कौशल्य, स्टार्टअप्स आणि कंपन्या, भांडवल आणि सरकार/पायाभूत सुविधा या चार मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित करून, या कार्यक्रमात गोव्याला एआयची प्रादेशिक राजधानी म्हणून स्थान देण्यासाठी प्रस्तावित आराखड्याची रूपरेषा आखण्यात आली.

गोवा एआय मिशन २०२७च्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पुढील वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत :

● सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाजात बहु-भागधारकांच्या माहितीद्वारे या मिशनच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गोवा एआय सल्लागार परिषदेची योजना आहे.

● राज्यभर नैतिक, समावेशक आणि जबाबदार एआय स्वीकारण्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी गोवा एआय धोरण प्रस्तावित आहे.

● शालेय स्तरावर एआय शिक्षणाचे एकत्रीकरण हे विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी तयार करते. त्याचबरोबर भविष्यासाठी कुशल कार्यबल तयार करण्यास देखील मदत करते.

● गोवा एआय लॅब ही भौतिक जागा म्हणून डिझाइन केलेली आहे, जिथे स्टार्टअप्स एकत्र येऊन सहयोगाद्वारे आपापल्या कल्पना सामायिक करू शकतात.

● कोकणी लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) विकसित करणे, हे राज्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटल पद्धतीने जतन करण्यास प्रोत्साहन देण्याची अपेक्षा आहे.

● गोवा.एआय इनोव्हेशन फंड आशादायी एआय स्टार्टअप्स आणि माध्यमांना इक्विटी गुंतवणूक प्रदान करेल, अशी अपेक्षा आहे.

● सर्जनशीलता वाढविणे, उदयोन्मुख प्रतिभा ओळखणे आणि नाविन्यपूर्ण एआय उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी एआय स्टार्टअप हॅकेथॉनचा प्रस्ताव आहे.

मंत्री खंवटे म्हणाले, आम्ही गोव्याला उपयोजित संशोधन, प्रयोग आणि उद्योग सहकार्यासाठी प्रादेशिक केंद्र म्हणून स्थापित करण्यास, प्रमुख संस्थांमध्ये एआय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी देखील काम करत आहोत. हे एआय-नेतृत्वाखालील प्रगतीसाठी गोव्याला जागतिक स्तरावर, संबंधित केंद्रात रूपांतरित करण्याबद्दल आहे. गोवा.एआय हे नागरिकांना सक्षम बनवेल, नवोपक्रमाला गती देईल, प्रशासन विस्तारण्यास मदत करेल आणि प्रत्येक क्षेत्रात आर्थिक संधी देखील खुल्या करेल.

गोवा एआय मिशन २०२७ हे गोवा राज्याला एआय-सज्ज करण्यासाठी दीर्घकालीन व बहु-भागधारकांच्या प्रयत्नांची सुरुवात आहे. जे सरकार, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि नागरिकांना एकत्र आणून राज्याला भविष्यासाठी तयार करून भविष्याला सक्रियपणे आकार देत असल्याची खात्री करत आहे.

Trending

Exit mobile version