गोवा खबर

अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेसाठी समिती स्थापन; विरोधकांच्या रणनीतीवरही चर्चा

Published

on

Spread the love

गोवा खबर : भाजप कोअर कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत गोव्यातील अॅप आधारित टॅक्सी सेवा आणि त्या संदर्भातील वाढता विरोध लक्षात घेता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, ती या मुद्यावर काम करणार आहे.

या समितीचा उद्देश अॅप आधारित टॅक्सी सेवेसंदर्भातील जनतेचे प्रश्न, चालकवर्गाचे मुद्दे, आणि तांत्रिक अडचणी समजून घेऊन योग्य तो तोडगा काढणे असा आहे.

तसेच येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून येणाऱ्या आरोपांना आणि मुद्द्यांना कसे तोंड द्यायचे, याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या संदर्भात दामू नाईक यांनी सांगितले, विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे विषय आहेत. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत भाजप आपली भूमिका ठामपणे मांडणार आहे.

Trending

Exit mobile version