गोवा खबर

अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर एफडीएची मोहीम तीव्र : राणे यांचा इशारा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून आल्यास संबंधितांवर एफडीएची कारवाई कठोरपणे केली जाणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिला आहे.

आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरणारे कृत्रिम रंग, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि हानिकारक पदार्थांचा वापर या सगळ्यावर आता सरकारचे लक्ष केंद्रित झाले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांना या कारवाईसाठी मोकळे हात देण्यात आले असून, या मोहिमेचा उद्देश कोणत्याही विक्रेत्यांचा छळ करणे नसून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा आहे, असे स्पष्ट करत राणे यांनी कडक पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला.

तसेच राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि चिखली येथील इस्पितळाचा दर्जा उंचावण्यावरही लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, बोंडला अभयारण्य आता जनतेसाठी खुले करण्यात आले असून, तेथील प्राण्यांचे आरोग्य तपासण्यासाठी घेतलेले नमुने निगेटिव्ह आले असल्याची माहिती वनमंत्री या नात्याने त्यांनी दिली.

Trending

Exit mobile version