गोवा खबर

कोरगाव सरपंचपदी नीता नितीन नरसे यांची बिनविरोध निवड 

Published

on

कोरगाव सरपंचपदी नीता नर्से यांची निवड झाल्यानंतर पंचायत मंडळ व समर्थक.
Spread the love

गोवा खबर : कोरगाव सरपंच पदी नीता नितीन नरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागच्या दीड महिन्यापूर्वी कोरगावचे सरपंच अब्दुल नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा अलिखित करारानुसार दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते.

पंचायत संचनालयांकडून दोन वेळा नवीन तारखा सरपंच निवडीसाठी जाहीर केल्या होत्या. परंतु त्या त्यावेळी ती निवडणूक झाली नाही. तिसऱ्या वेळी पंचायत संचालकाने सात जुलै रोजी ही तारीख निवडणुकीसाठी निश्चित केली होती. त्यानुसार नीता नितीन नरसे यांनी आपल्या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. तिला माजी सरपंच तथा विद्यमान पंच अनुराधा कोरगावकर व कल्पिता कलशावकर यांनी अनुक्रमे अनुमोदन आणि सूचक शिफारस केली.

यावेळी उपसरपंच दिवाकर जाधव पंच समिल भाटलेकर पंच देविदास नागवेकर, माजी सरपंच तथा विद्यमान पंच अनुराधा कोरगावकर, पंच उमेश च्यारी, पंच लौकिक शेट्ये, पंच कल्पिता कलशावकर ,पंचायत सेक्रेटरी श्रद्धा कोरगावकर, निर्वाचन अधिकारी म्हणून ठाकूर आदी उपस्थित होते.

नीता नरसे हिचा एकमेव सरपंच पदासाठी अर्ज आल्यामुळे तिची बिनविरोध निवड निर्वाचन अधिकाऱ्याने जाहीर केली.

यावेळी प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित सरपंच नीता नरसे यांनी सांगितले की सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास पंचायत क्षेत्राचा केला जाईल. आपल्याला ज्या सरपंच पदासाठी सर्व पंच सदस्यांनी पाठिंबा दिला आणि देवदेवतांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे आपण या पदावर पोचल्याचे सांगून आपण कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. सर्व प्रभागाचा समान विकास करण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले.

स्थानिक नागरिक नरेश कोरगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले ही पंचायत मंडळ आपल्या नेतृत्वाखाली पॅनल आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच पाठिंब्याने आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. ही पंचायत मंडळ  सावंत यांच्या समर्थक मानल्या जातात. त्यांच्याच मार्फत या पंचायत क्षेत्राचा विकास केला जाईल. काही जणांनी यात राजकारण आणून सरपंच पदासाठी दोन तारखा पुढे ढकलून काय साध्य केले असेल? ते त्यांनाच माहित. परंतु स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना कोरगाव मधून आम्हीच निवडून आणलं याची त्यांना भान राहिलं नाही, असा दावा यावेळी नरेश कोरगावकर यांनी केला.

नितीन नरसे यांनी प्रतिक्रिया देताना विकासासाठी पंचायत क्षेत्राचा विकास पूर्णपणे केला जाईल. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून सरकारच्या सहकार्यातून आणि नागरिकांच्या मागणीनुसार विकास केला जाईल. आजच्या महिला सक्षम बनलेला आहेत. जरी महिला सरपंच असल्या तरी पुरुष कुठेही हस्तक्षेप करणार नाही. याची ग्वाही यावेळी नितीन नरसे यांनी आपली पत्नी नीता नरसे सरपंच झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

यावेळी चांदेलचे माजी सरपंच तुळशीदास गावस, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, माजी सरपंच अब्दुल नाईक, माजी सरपंच अनुराधा कोरगावकर आदींनी सरपंच नीता नरसे हिचे अभिनंदन करत असताना विकासासाठी आमचेही सहकार्य सदोदित मिळेल अशी ग्वाही दिली.

Trending

Exit mobile version