गोवा खबर : राष्ट्रासाठी कर्तव्यनिष्ठा जागवण्यासाठी गुरुवार, १० जुलै रोजी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात ७७ ठिकाणी, तर गोव्यात ६ ठिकाणी होणार आहे.
सनातन संस्थेच्या वतीने सिद्धपुरूष नारायण देव देवस्थान, काणका बांध, म्हापसा येथे सायंकाळी ५ वाजता; संत गाडगे बाबा सभागृह, पुंडलिक नगर,पर्वरी येथे सायंकाळी ५ वाजता; महारुद्र हनुमान मंदिर सभागृह, नवे वाडे, वास्को येथे सायंकाळी ५ वाजता; बाबू नायक सभागृह, मारुती मंदिर , दवर्ली , मडगाव येथे सायंकाळी ५ वाजता; सुंदरम सभागृह, बँक ऑफ इंडियाजवळ, फोंडा रोड, होंडा येथे सायंकाळी ६ वाजता आणि राजीव गांधी कला मंदिर, बेतोडा रोड, फोंडा येथे सायंकाळी ५.३० वाजता गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे.
या महोत्सवात भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्याचा प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण; रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ; समाज, राष्ट्र आणि धर्म विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन; तसेच ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयांवर मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. याव्यतिरिक्त धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि राष्ट्र-धर्म विषयक फलक प्रदर्शनही महोत्सवस्थळी लावण्यात येणार आहे. विशेष आकर्षण म्हणून काही ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ – सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ व मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. १० जुलैला सायं ६.०० वा. मराठी भाषेतील महोत्सवाचा लाभ पुढील लिंकवरून घेता येईल : Sanatan.org/mr/gurupurnima .